गुंतवणूकदारांसाठी इम्रानचा बेलिडान्स

इस्लामाबाद: पाकिस्तानच्या सरहद चेंबर ऑफ कॉमर्स ऍण्ड इंडस्ट्रीजने “इन्व्हेस्टमेंट समिट’चे आयोजन केले होते. यामध्ये अनेक परदेशी गुंतवणूकदारांना आमंत्रित करण्यात आले होते. यावेळी गुंतवणूकदारांच्या मनोरंजनासाठी चक्क बेली डान्सर्सचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता. पाकिस्तानी पत्रकार गुल बुखारी यांनी त्यांच्या ट्‌विटरवर या डान्सचा व्हिडियो शेअर केला आहे. व्हिडियो व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडियावर पाकिस्तानवर मोठ्या प्रमाणात टीका होत आहे.

गुंतवणूकदारांच्या समिटचे आयोजन 4 से 8 सप्टेंबरदरम्यान अझरबैजान येथील बाकू येथे करण्यात आले होते. या व्हिडियोमध्ये एक व्यक्ती डान्सरचा फोटो घेताना दिसत आहे. व्हिडियोवर हे स्पष्ट होत आहे की, पाकिस्तानने गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी हा कार्यक्रम ठेवला होता. गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी इतक्‍या खालच्या पातळीवर उतरण्याची वेळ पाकिस्तानच्या सरकारवर आली आहे, हे यातून समोर येत आहे. इम्रान खान विविध प्रसंगी आपले सरकार आल्यापासून पाकिस्तानमध्ये मोठा बदल झाल्याचा दावा करत असतात. मात्र, हा व्हिडियो व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडियावर युजर्सनी पाकिस्तानचे हे पाऊल म्हणजे ‘नया पाकिस्तान’ असल्याचा टोला लगावला आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)