इस्लामाबाद – पाकिस्तानचे माजी पंतप्रधान आणि तेहरीक ए इन्साफ पार्टीचे नेते इम्रान खान यांनी विरोधकांपुढे एक प्रस्ताव ठेवला आहे. त्यानुसार विरोधकांनी इम्रान खान सरकारविरोधात संसदेत मंजूर केलेला अविश्वास ठराव मागे घ्यावा, असा प्रस्ताव इम्रान खान यांनी सुचवला आहे. त्याबदल्यात विरोधकांना काय देता येईल, याचा विचार केला जाऊ शकतो, असे माहिती मंत्री फवाद चौधरी यांनी म्हटले आहे.
“पीटीआय’ सरकारच्या विरोधातील अविश्वास ठरावामुळे राजकारणामध्ये एक प्रकारची कटुता आली आहे. त्यामुळे निर्माण झालेली वर्तमानातील स्थिती देशासाठी हानीकारक आहे, असेही फवाद चौधरी म्हणाले.
मात्र आणीबाणी लागू केली जाण्याची शक्यता त्यांनी फेटाळून लावली आहे. आणीबाणी लागू करण्यासाठीचे अधिकार आता 18 व्या घटनादुरुस्तीमुळे मर्यादित झाले आहेत, असे चौधरी म्हणाले.
पाकिस्तान तेहरीक ए इन्साफ पार्टीच्यावतीने आगामी काळात इस्लामाबादेत एक मोठा मेळावा घेतला जाणार आहे. त्यावेळी या अविश्वास ठरावाच्या विरोधात एक लघु सार्वमत घेतले जाईल, असेही चौधरी यांनी सांगितले.