इम्रान खान यांनी निवडणूक जिंकून दाखवावी; मौलाना फजलूर यांचे आव्हान

सुक्कूर (पाकिस्तान),  – पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी जरी संसदेत विश्‍वासदर्शक ठराव जिंकला असला, तरी त्याची घटनात्मक किंवा कायदेशीर अशी कोणतीही वैधता नाही. त्यांनी जनतेतून विश्‍वासदर्शक ठराव जिंकून दाखवावा. त्यांनी निवडणूक जिंकून दाखवावी, असे आव्हान पाकिस्तान डेमोक्रटिक मुव्हमेंटचे नेते मौलाना फजलूर रेहमान यांनी दिले आहे.

पंतप्रधान इम्रान खान यांना पाकिस्तानच्या अध्यक्षांनीच बहुमत सिद्ध करण्याची सूचना केली होती. मात्र पंतप्रधान इम्रान खान यांच्या सूचनेनुसार अध्यक्षांनीच हे अधिवेशन बोलावले होते. त्यामुळे या अधिवेशनातील विश्‍वासदर्शक ठरावाला कोणताही घटनात्मक अथवा कायदेशीर आधार नाही, असे मौलाना फजलूर रेहमान पत्रकार परिषदेमध्ये म्हणाले.

पाकिस्तानच्या संसदेतील निवडणूकीत पराभव झाल्याने अध्यक्षांनी पंतप्रधान इम्रान खान यांना बहुमत सिद्ध करायला सांगितले. मात्र इम्रान खान यांनी मांडलेल्या विश्‍वासदर्शक ठरावामध्ये याचा सारांशाने उल्लेख करण्यात आलेला नव्हता. त्यामुळे संसदेतील अधिवेशन पाकिस्तान डेमोक्रॅटिक मुव्हमेंट ,मुव्हमेंटला अमान्य आहे. तसेच सध्याच्या बनावट पंतप्रधानांनाही “पीडीएम’ ची मान्यता नाही. संसदेमध्ये पंतप्रधानांच्या बाजूने मतदान करावे, म्हणून कोणी प्रयत्न केले आहेत, हे आपल्याला माहिती आहे, असेही ते म्हणाले.

शनिवारी पाकिस्तान मुस्लिम लीग (नवाझ गट) च्या शनिवारी झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये माजी पंतप्रधान शाहिद खगान अब्बासी, मरियम औरंगजेब आणि अन्य पदाधिकाऱ्यांना “पाकिस्तान तेहरीक ए इन्साफ’पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून धक्काबुक्की होण्यावरही रेहमान यांनी टीका केली.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.