‘इमरान खान मुर्दाबाद’चे पाक संसदेत घोषणा

नवी दिल्ली – भारताच्या वायूसेनेने आज पाकिस्तानमध्ये घुसून दहशतवादी तळांवर हल्ला केला. यामध्ये २००-३०० दहशतवादी ठार झाले आहेत. भारतीय वायूसेनेने केलेली ही कारवाई आतापर्यंतची सर्वांत मोठी असल्याचे सांगण्यात येते आहे. बालाकोट, चाकोथी आणि मुजफ्फरबाद याठिकाणी वायुसेनेने हल्ले केले. याचे पडसाद आज पाकिस्तानच्या संसदेतही उमटले आहेत. पाक संसदेत विरोधकांनी पंतप्रधान इमरान खानच्या विरोधात घोषणाबाजी केली.

भारताच्या वायूसेनेने केलेल्या कारवाईनंतर पाकिस्तान संसदेत विरोधकांनी अभूतपूर्व गोंधळ घातला. यावेळी ‘इमरान खान मुर्दाबाद’चे नारेही लागवण्यात आले. याव्यतिरिक्त भारताला ऑर्गनायझेशन ऑफ इस्लामिक कॉऑपरेशन (OIC) मध्ये भारतावर बहिष्कार टाकण्याची मागणीही पाक खासदारांनी केली आहे. दरम्यान, ओआयसीमध्ये सहभागी होण्यासाठी भारताला पहिल्यांदाच निमंत्रण देण्यात आले होते.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.