इम्रान खान यांच्या शपथविधीचे मोदींना निमंत्रण?

पाकिस्तानमध्ये नुकत्याच पार पडलेल्या सार्वत्रिक निवडणुकांचे निकाल हाती आले आहेत. इम्रान खान या जगप्रसिद्ध माजी पाकिस्तानी क्रिकेटपटूच्या पाकिस्तान तेहरिक-ए- इन्साफ या पक्षाने सर्वाधिक जागा जिंकल्या आहेत. ११ ऑगस्ट रोजी इम्रान खान पाकिस्तानचे पंतप्रधान म्हणून शपथ घेतील असे स्वतः इम्रान खान यांनी स्पष्ट केले आहे.
दरम्यान पाकिस्तान तेहरिक-ए- इन्साफ हा इम्रान खान यांचा पक्ष शपथविधीसाठी जोरदार तयारी करत असून या शपथविधी सोहळ्यासाठी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह सार्कचे सदस्य असणाऱ्या देशांच्या प्रमुखांना निमंत्रित करण्याच्या विचाराधीन असल्याचे वृत्त आहे.
-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)