दिल्ली : भारतीय जनता पक्षाने रविवारी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांना फटकारले आहे. इम्रान खान यांना टेररिस्टस्थांचे प्रमुख असल्याचे भाजपने म्हंटले आहे. नागरिकता दुरुस्ती कायद्याबद्दल कॉंग्रेसवरही भाजप ने आरोप केला आहे. देशात का कायद्याविरोधात काँग्रेस भ्रम पसरवीत असल्याचा आरोप केला आहे.
भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते संबित पात्रा यांनी इम्रान खान उत्तर दिले आहे. इम्रान खान आपण टेरेरिस्टस्थानाचे प्रमुख आहात असे ते म्हणाले. आपण ट्विट करून भारताविरूद्ध का बोलत आहात? असेही ते म्हणाले. काही लोकांना पाकिस्तानसारख्या भारतातही द्वेष पसरवायचा आहे.
कॉंग्रेस नेते रशीद अल्वी यांनी नरेंद्र मोदी आणि इम्रान खान यांचे हे षडयंत्र असल्याचे म्हटले होते. यावर संबित पात्र याना विचारले असता ते म्हणाले कि, सोनिया गांधी अशा वक्तव्याशी सहमत आहेत का? कॉंग्रेसचे अधिकृत वक्तव्य आहे? रशिद अल्वी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान हे नागरिकत्व दुरुस्ती कायद्यावरील हिंसाचारात सहभागी असल्याचे वक्तव्य केले होते.