मुंबई – मनोरंजन जगतात सध्या ब्रेकअपच्या बातम्या समोर येत आहेत. अभिनेता सोहेल खान आणि त्याच्या पत्नीच्या घटस्फोटाच्या बातम्यांनंतर आता आणखी एक नातं तुटण्याच्या मार्गावर आहे. बातम्यांनुसार, बॉलिवूड अभिनेता इम्रान खान आणि त्याची पत्नी अवंतिका मलिक यांनी आपलं नातं संपवण्याचा निर्णय घेतला आहे.
इम्रान खानचे पत्नी अवंतिका मलिकसोबतचे नाते गेल्या काही वर्षांपासून बिघडत चालले आहे. इतकंच नाही तर या नात्यात इतकं दुरावा आला की दोघांनीही वेगळं राहण्याचा निर्णय घेतला. इम्रानने 2011 मध्ये अवंतिकासोबत लग्न केले होते. 2014 मध्ये या दोघांच्या घरी मुलगी इमराचा जन्म झाला. मुलीच्या जन्मानंतर त्यांच्या नात्यात थोडी कटुता निर्माण झाली आणि 2019 मध्ये अवंतिका इमरानला सोडून आई-वडिलांच्या घरी गेली.
मिळालेल्या वृत्तानूसार, काम न मिळाल्याने इम्रान खान आर्थिक संकटाचा सामना करत होता. आर्थिक संकटामुळे दोघांमध्ये भांडणे सुरू झाली, त्याचा परिणाम त्यांच्या मुलीवर होऊ लागला. दोघांच्या कुटुंबीयांनी हे नाते पुन्हा जोडण्याचा खूप प्रयत्न केला, पण त्यातून काहीही निष्पन्न झाले नाही.
इम्रानपासून विभक्त झाल्यानंतर, 2020 मध्ये, अवंतिकाने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून एक पोस्ट शेअर केली ज्यामध्ये तिने लग्न आणि घटस्फोट दोन्ही कठीण असल्याचे वर्णन पोस्टमध्ये केले होते.