इस्लामाबाद – पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांना करोनाची लागण झाली आहे. त्यांनीच दोनच दिवसांपूर्वी चीनमध्ये तयार करण्यात आलेली करोनाविरोधी लस घेतली होती. त्यांच्या निकयवर्तीयांनी ट्वीटरवर ही माहिती दिली असून इम्रान यांना सध्या विलगीकरणात ठेवण्यात आले आहे.
18 मार्च रोजी इम्रान यांनी चीनच्या सायनोफार्मची लस घेतली होती. चीनची ही एकमात्र लस सध्या पाकिस्तानात उपलब्ध आहे. या लसीचे दोन डोस घ्यावे लागतात. एक फेब्रुवारी रोजी पाच लाख डोस चीनने पाकिस्तानला दान म्हणून दिले आहेत.
दरम्यान, या लसीचे दुसरे टप्प्यातील डोस 17 मार्च रोजी पाकिस्तानात पोहोचले होते व त्याच्या दुसऱ्याच दिवशी इम्रान यांना लस देण्यात आली होती. त्यांनी हा पहिलाच डोस घेतला होता. मात्र त्यानंतर काही तासांतच त्यांना करोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे.
दरम्यान, शनिवारी एका दिवसांत पाकिस्तानात करोनाचे जवळपास चार हजार रूग्ण आढळले आहेत. आता रूग्ण वाढीचा दर साडेनउ टक्क्यांपेक्षा जास्त असल्याचे सांगण्यात आले आहे.