सध्या जगभरासह भारतामध्ये देखील वेब सिरीजने प्रेक्षकांना चांगलेच वेड लावले आहे. वेब सिरीजचं हे विश्व दिवसेंदिवस वाढत असून, यामध्ये बडे कलाकारसुद्धा भूमिका साकारण्यामध्ये रुची दाखवत आहेत. आता वेब सिरीजमध्ये काम करणाऱ्यांच्या यादीमध्ये आणखीन एका मोठ्या नावाची भर पडली आहे. बॉलिवूड अभिनेता ‘इम्रान हाशमी’ नेटाफिक्सच्या ‘बार्ड ऑफ ब्लड’या वेब सिरीजमधून वेब वर्ल्डमध्ये पदार्पण करत आहे.
He doesn’t exist, so you can. #BardOfBlood Coming soon, only on @NetflixIndia. @iamsrk @BilalS158 @ribhudasgupta @_GauravVerma @RedChilliesEnt @sobhitaD @IamKirtiKulhari @ItsVineetSingh pic.twitter.com/4dJDgMP1D0
— Emraan Hashmi (@emraanhashmi) July 6, 2019
‘बार्ड ऑफ ब्लड’ या वेबसीरीज निर्मिती अभिनेता ‘शाहरुख खान’ करत असून येत्या 27 सप्टेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. ही वेबसीरीज लेखक बिलाल सिद्दीकी यांचं पुस्तक ‘बार्ड ऑफ ब्लड’वर आधारित आहे. अनेक भाषांमध्ये प्रदर्शित होणाऱ्या या वेबसीरीजचं कथानक एका गुप्तहेराच्या बाजूने फिरत राहत.