आणखीन एका हॉरर सिनेमात काम करणार इमरान हाश्‍मी

करोना काळात अनेक कलाकारांचे सिनेमा डिजिटल प्लॅटफॉर्मवर रिलीज झाले. यामध्ये इमरान हाश्‍मीचे लीड रोल असलेले “मुंबई सागा’ आणि “चेहरे’ यावर्षी थिएटरमध्ये रिलीज झाले. इमरान हाश्‍मीने यापूर्वीच्या करिअरमध्ये 

“राज’, “राज रिबूट’, “एक थी डायन’ सह अनेक हॉरर सिनेमे केले आहेत. इमरानचा “एज्रा’ हा आणखीन एक हॉरर सिनेमा बनून तयार आहे. 2017 मध्ये आलेल्या याच नावाच्या एका मल्याळम सिनेमाचा हा हिंदी रिमेक असणार आहे.

हॉरर सिनेमे फोर जास्त बनत नाहीत, पण जे बनतात ते एकाच साच्याचे असतात. त्यामध्ये काहीतरी वेगळेपण असायला पाहिजे किमान कथेची मांडणी तरी वेगळ्या पद्धतीने व्हायला पाहिजे, असे इमरानला वाटते.

इतर सिनेमांपेक्षा हॉरर सिनेमे करायला इमरानला खूप आवडले कारण हे करत असताना आपल्या डोक्‍याला ताप देण्याची गरज नसते. सगळे काही भूतावर सोडून द्यायचे असते, असेही तो म्हणाला.

करोना काळात अनेक कलाकारांच्या हाताला काम नव्हते. या अनुभवावर तो एक पुस्तक लिहिण्याचाही विचार करतो आहे. अर्थात हा त्याचा स्वतःचा अनुभव असणार आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.