सलमान खानच्या बहुप्रतिक्षित ऍक्शन थ्रिलर सिनेमा टायगर बाबत मोठी बातमी समोर आली आहे. डायरेक्टर मनीष शर्मा यांच्या या सिनेमात खलनायकाची भूमिका इमरान हाश्मी साकारत आहे. इमरान हाश्मीने सिनेमातील आपल्या भागांची शूटिंगही सुरू केली आहे. यशराज बॅनरखाली बनत असलेल्या या सिनेमा इमरान निगेटिव्ह भूमिकेत आहे. तो सिनेमात पाकिस्तानी एजंटच्या भूमिकेत दिसणार आहे.
सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या बातमीत म्हटले आहे की, सध्या फिल्मचा प्लॉट पूर्णपणे गोपनीय ठेवण्यात आला आहे. मात्र मीडियामधील बातम्यांनुसार या सिनेमात इमनरान हाश्मी आपले सिक्स पॅक्स ऍबही दाखवेल. तर मीडिया रिपोर्टनुसार टायगरमध्ये सलमानसोबत इमरानचेही शर्टलेस फाईट सिक्वेंस आहेत. रायटिंग टीमचे म्हणणे होते की सलमानसमोर इमरानची भूमिका कमकुवत दिसता कामा नये.
सलमानने आपल्या भूमिकेसाठी खूप मेहनत घेतली आहे. इमरान हाश्मीने आपली बॉडी साईज साधारण सलमानसारखीच केली आहे. दरम्यान, कतरिनाच्या भूमिकेवरून अद्याप पडदा उठलेला नाही. कतरिनाचे नाव सिनेमात जोया होते.
सलमानच्या राधेला संमिश्र प्रतिक्रिया मिळालेल्या आहेत. सोशल मीडियावर तर या चित्रपटाची यथेच्छ टिंगल उडवली जाते आहे. त्यामुळे टायगरकडून सलमानलाही मोठ्या अपेक्षा असणार आहेत. इम्रानही भट्ट कॅम्पच्या बाहेर प्रथमच एका दमदार भूमिकेत तेही सलमानसोबत झळकणार असल्याने त्याच्या दृष्टीनेही या चित्रपटाला विशेष महत्त्व असणार आहे.