सरकारी बॅंकांची कार्यक्षमता सुधारणार

प्रातिनिधिक फोटो

बॅंकांच्या कामाच्या मूल्यांकनासाठी नवीन पद्धत येणार

नवी दिल्ली – सार्वजनिक बॅंकांमध्ये आगामी काळात चालना मिळण्यासाठी आणि व्यवहारांमध्ये सुधारणा होण्यासाठी केंद्र सरकार लवकरच नवीन योजना तयार करण्याच्या तयारीत आहे. कर्मचारी वर्गात कौशल्यावर आधारित व्यवस्थापन आणि बॅंकिंग कार्यात सुसूत्रता येण्यासाठीच ही पावले उचलण्यात येत असल्याची माहिती केंद्र सरकारने दिली आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

सार्वजनिक क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या बॅंकांमध्ये एक समान कॉर्पोरेट गव्हर्नन्स राबवण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्न करत आहे. कंपनी कायद्याप्रमाणे काम होईल, अशी सरकारची एकूण योजना आहे. तसाच बॅंकेचा व्यवहार करण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत. यासाठी बॅंक बोर्ड ब्यूरो (बीबीबी) यांच्याकडून त्यासंदर्भातील सूचना देण्यात आल्या आहेत. आम्ही रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडिया(आरबीआय) सोबत चर्चा करत असल्याचे स्पष्टीकरण यावेळी बीबीबी यांनी दिले आहे.

आरबीआयच्या मार्गदर्शनाखाली सरकार बीबीबी आणि आरबीआय बॅंकांच्या कार्यपद्धतीचे मूल्यमापन करण्यासाठी एक कृती आराखडा तयार करणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. सार्वजनिक, खासगी क्षेत्रांतील बॅंका आणि वित्तीय संस्थांच्या कार्यात गव्हर्नसचा प्रसार आणि प्रचार व्हावा व अंतर्गत कार्यपद्धतीत योग्य अशा प्रकारचे नियंत्रण व्यवस्थापनाची ही यंत्रणा असणार आहे.

सार्वजनिक क्षेत्रात कार्यरत असणाऱ्य़ा बॅंकांच्या व्यवहारात सुधारणा करण्याच्या दृष्टिकोनातून हे पाऊल उचलण्यात आले. बॅंकिंग क्षेत्रात बॅंकांचे संचालक मंडळ व व्यावसायिक कार्यपद्धती, माहितीची सुरक्षा, मानव निर्मित व्यवस्थापन करण्यासाठी तज्ज्ञांची नियुक्ती प्रत्येक बॅंकांमध्ये करणार असल्याचे बीबीबीने याबाबत काढलेल्या पत्रकात सांगितले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)