पुणे -राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांनी चालविलेल्या प्राथमिक शाळांकरिता वितरित करण्यात येणाऱ्या विविध सुविधांच्या सादिल अनुदानाच्या रकमेतून खर्च करावयाच्या बाबींमध्ये सुधारणा करण्याचा निर्णय राज्य शासनाच्या शालेय शिक्षण विभागाने घेतला आहे.
प्राथमिक शाळांसाठी भौतिक, शैक्षणिक सुविधा व दैनंदिन उपयोगाचे साहित्य उपलब्ध करण्यासाठी मागील वर्षाच्या वेतन खर्चाच्या 4 टक्केपर्यंत सादिलवार खर्च करण्यास शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात आलेली आहे.
सादिलवार खर्चासाठी मंजूर केलेल्या रकमेपैकी शाळा पातळीवर 80 टक्के रक्कम खर्च करावयाची असल्याने त्यासाठी मार्गदर्शक यादीही देण्यात आलेली आहे. जिल्हा पातळीवर 20 टक्के रक्कम खर्च करावयाची असल्याने त्याबाबतही मार्गदर्शक सूचना दिलेल्या आहेत.