Chris Cairns | ख्रिस केर्न्सच्या प्रकृतीत सुधारणा

वेलिंग्टन – न्यूझीलंडचा माजी अष्टपैलू क्रिकेटपटू ख्रिस केर्न्सयाच्या प्रकृतीत आता चांगलीच सुधारणा झाली आहे. गेल्या महिन्यात झालेल्या हृदय शस्त्रक्रियेनंतर त्याला स्पायनल स्ट्रोकही आला होता व त्याला लाइफ सपोर्ट सिस्टीमवरही ठेवण्यात आले होते.

त्याच्या प्रकृतीत आता चांगलीच सुधारणा होत असून त्याच्यावर ऑस्ट्रेलियातील एका खासगी रुग्णालयात उपचार झाले होते. आता त्याला घरी सोडण्यात आले असून लवकरच आपण पूर्ण तंदुरुस्त होऊ असे त्याने माध्यमांना सांगितले आहे. त्याल्या महिन्यात हृदयविकाराचा झटका आला होता.

केर्न्सने न्यूझीलंडकडून 62 कसोटी आणि 215 एकदिवसीय सामने खेळले आहेत. तसेच त्याने दोन टी-20 सामनेही खेळले आहेत. 1989 ते 2006 या कालावधीत त्याने न्यूझीलंडकडून सर्वोत्तम अष्टपैलू खेळाडू म्हणून सरस कामगिरी केली. नंतर त्याने काही काळ समाचोलनही केले होते.

त्याचे वडील लान्स केर्न्स हे देखील न्यूझीलंडचे प्रसिद्ध क्रिकेटपटू होते. 2008 साली भारतात खेळवण्यात आलेल्या आयपीएल स्पर्धेत चंदीगड लायन्स संघाकडून खेळताना मॅच फिक्‍सिंग केल्याचे त्याच्यावर आरोप करण्यात आले होते. हे सर्व आरोप फेटाळलेल्या केर्न्सला कायदेशीर लढाईनंतर न्यायालयाने क्‍लिनचिटही दिली होती.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.