नवनीत राणा यांच्या प्रकृतीत सुधारणा; ‘आयसीयू’मधून बाहेर

स्वतः नवनीत राणा यांनी आपल्या प्रकृतीबाबत फेसबुकद्वारे माहिती दिली

मुंबई – अमरावती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार नवनीत राणा यांना कोरोना विषाणूची बाधा झाली आहे. नवनीत राणा यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांना नागपूर येथील एका खाजगी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले होते. मात्र प्रकृती खालावल्याने त्यांना मुंबईतील लीलावती रुग्णालयामध्ये हलवण्यात आलं होत. अशातच आता नवनीत राणा यांनी आपल्या प्रकृतीबाबत फेसबुकद्वारे माहिती दिली असून आपल्याला आयसीयूमधून सामान्य कक्षात (जनरल वार्ड) हलवण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली आहे.

नागपूर येथील रुग्णालयात उपचार सुरु असतांना राणा यांना श्वसनास अडचण जाणवत होती. येथील डॉक्टरांनी त्यांना पुढील उपचारांसाठी मुंबई येथे हलवण्याचा सल्ला दिला. यानंतर राणा यांना मुंबई येथील रे रूग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं.

दरम्यान, आपल्या प्रकृतीबाबत माहिती देताना राणा यांनी फेसबुकवर एक व्हिडीओ शेअर केला असून आता आपल्या प्रकृतीमध्ये सुधारणा होत असल्याने आपल्याला अतिदक्षता विभागातून सामान्य विभागात दाखल करण्यात आलं असल्याची माहिती त्यांनी दिली. आपण लवकर बरे होऊन लवकरच जनसेवेत पुन्हा सज्ज होऊ असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.

 

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.