कमलनाथ यांच्याशी संबंधीत व्यक्तींवर दुसऱ्यादिवशीही छापे

नवी दिल्ली – आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी आज लागोपाठ दुसऱ्या दिवशी मुख्ममंत्री कमलनाथ यांच्याशी संबंधीत व्यक्तींवर छापे घातले. या छाप्यातून काही कागदपत्रे आणि रोकड जप्त करण्यात आल्याचे सांगण्यात येते पण नेमकी काय सामग्री जप्त करण्यात आली आहे याचा अधिकृत खुलासा आयकर विभागाच्या अधिकाऱ्याकडून करण्यात आलेला नाही. हवाला व्यवहार आणि करचुकवेगीरी इत्यादी कारणास्तव हे छापे घालण्यात आले आहेत. भोपाळ, इंदुर, दिल्ली इत्यादी ठिकाणी हे छापा सत्र काल पासून सुरू आहे काल कमलनाथ यांच्याशी संबंधीत 50 ठिकाणांवर छापे घालण्यात आले होते.

या छाप्यांनंतर हवाला डीलर पारसमल लोढा यांच्यासह एकूण सहा जणांची आता आयकर विभागाने चौकशी सुरू केली आहे.या छाप्यांमध्ये निवडणुकीशी संबंधीत रोकड मोठ्या प्रमाणात हस्तगत करण्यात आल्याचे समजते परंतु त्याविषयी आयकर विभागाचे अधिकारी तोंड उघडण्यास तयार नाहीत.

या छाप्यांची माहिती केंद्रीय प्रत्यक्ष कर विभाग आणि निवडणूक आयोगाला कळवण्यात आली असून त्यांच्याकडे त्या विषयीचे अहवाल पाठवण्यात आले आहेत. काल मुख्यमंत्र्यांचे ओएसडी प्रविणकुमार कक्कड, कमलनाथ यांचे माजी सल्लागार राजेंद्र मिगलानी, अश्‍विनी शर्मा, तसेच त्यांच्या जवळच्या नातेवाईकांच्या ठिकाणांवर छापे टाकण्यात आले. ही प्रक्रिया आजही सुरू राहिली.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.