पवारांच्या कार्याने प्रभावित होऊन राष्ट्रवादीत प्रवेश- प्रिया बेर्डे

अभिनेत्री प्रिया बेर्डे यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश

पुणे: सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्री आणि दिग्दर्शिका प्रिया लक्ष्मीकांत बेर्डे यांनी खासदार सुप्रियाताई सुळे यांच्या उपस्थितीत आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला. शरद पवारांच्या कार्याने प्रभावित होऊन राष्ट्रवादीत प्रवेश केल्याचं प्रिया बेर्डे म्हणाल्या. त्यांच्यासोबत अनेक कलाकारांनी सुद्धा राष्ट्रवादीत प्रवेश केला.

प्रिया बेर्डे म्हणाल्या, शरद पवार साहेबांना कलेची जाण आहे. त्यांना कलाकारांविषयी आदर आहे. त्यांची सांस्कृतिक जाण आम्हा कलाकारांना माहित आहे. त्यामुळे मी राष्ट्रवादीची निवड केली. तसेच मला आपल्या कलाकारांसाठी मला काम करायचे आहे.

राष्ट्रवादीने लॉकडाऊनच्या काळात लोक कलावंत आणि तंत्रज्ञ यांना मोठी मदत केली. राष्ट्रवादी काँग्रेसचेने ३ हजार लोक कलावंतांना प्रत्येकी ३ हजार रुपये मानधन दिले. कोणताच गवगवा न करता, राष्ट्रवादीने कलाकारांना मदत केली.

दरम्यान, प्रिया बेर्डे यांनी काही मागण्या केल्या. राज्य शासनाच्या जाहिरातीमध्ये मराठी कलाकारांना स्थान द्यावे. तसेच ज्येष्ठ कलावंताच्या मानधनात वाढ करावी. मालिका कलाकारांना ९० ऐवजी तीस दिवसात मानधन मिळावे, अश्या मागण्या त्यांनी केल्या.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.