महत्वपूर्ण : डबल म्यूटेंट स्ट्रेन विरोधात ‘ही’ लस प्रभावी

नवी दिल्ली – करोनाच्या संदर्भात आयसीएमआरकडून एक महत्वाची माहिती देण्यात आली आहे. भारत बायोटेकने निर्माण केलेली कोव्हॅक्‍सिन ही लस अनेक व्हेरिएंट्‌सवर परिणामकारक आहे. इतकेच नाही तर कोव्हॅक्‍सिन ही डबल म्यूटेंट स्ट्रेन विरोधातही प्रभावी असल्याचे आयसीएमआरने म्हटले आहे.

इंडियन काऊन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च अर्थात आयसीएमआरने केलेल्या अभ्यासानंतर हे निरीक्षण नोंदवण्यात आले आहे. कोव्हॅक्‍सिन लस डबल म्यूटेंट स्ट्रेनचा प्रभाव कमी करण्यासाठी एक उपयुक्त करोना लस आहे असे त्याद्वारेन सांगण्यात आले आहे. 

आयसीएमआर- नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजीने व्हायरसचे अनेक व्हेरिएंट्‌स यशस्वीरित्या वेगळे केले आहेत. त्यात यूके व्हेरिएंटचा बी.1.1.7, ब्राझिल व्हेरिएंट बी.1.1.2, साऊथ आफ्रीकन व्हेरिएंट बी. 1..351 चा समावेश आहे. 

त्यानंतर या संस्थांनी यूके विरोधात लढण्याची कोव्हॅक्‍सिनच्या क्षमतेचा अभ्यास केला. त्यानंतर कोव्हॅक्‍सिन लस व्हायरसच्या डबल म्यूटेंटचाही परिणाम कमी करण्यात सक्षम असल्याचा दावा करण्यात आला.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.