अकरावी प्रवेशासंबंधी महत्त्वाची बातमी, आतापर्यंत “इतक्या’ विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित

इनहाऊस, व्यवस्थापन व अल्पसंख्याक कोट्यांतर्गत 22 ऑगस्टपर्यंत संधी

पुणे – पुणे व पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीत इयत्ता अकरावी प्रवेश प्रक्रियेत विविध कोट्यांतर्गत 5 हजार 948 विद्यार्थ्यांचे कनिष्ठ महाविद्यालयात प्रवेश निश्चित झाले आहेत.

या विभागात 304 कनिष्ठ महाविद्यालयात 1 लाख 6 हजार 972 प्रवेशाच्या जागा उपलब्ध करुन देण्यात आलेल्या आहेत. यासाठी आतापर्यंत 98 हजार 946 विद्यार्थ्यांनी ऑनलाइन नोंदणी केलेली आहे. त्यात प्रवेश अर्जाचा भाग-1 हा 81,690 विद्यार्थ्यांनी भरला आहे. त्यातील 81,263 अर्जांची तपासणीही पूर्ण करण्यात आलेली आहे.

प्रवेश अर्जाचा भाग-2 भरण्यासाठी 75,821 विद्यार्थ्यांची नोंदणी झाली होती. त्यातील 74,164 विद्यार्थ्यांनी प्रक्रिया पूर्ण केली आहे. एकूण 73,353 विद्यार्थ्यांचे अर्ज लॉक करण्यात आलेले आहेत. 811 अर्ज अद्यापही लॉक करण्यात आलेले नाहीत.

इनहाऊस, व्यवस्थापन व अल्पसंख्याक या कोट्यांतर्गत विद्यार्थ्यांना प्रवेश घेण्यासाठी 12 ते 22 ऑगस्टपर्यंत संधी उपलब्ध करुन देण्यात आलेली होती. यातही विद्यार्थ्यांनी इनहाऊस कोटा प्रवेशाला प्राधान्य दिले होते. कोट्यांतर्गत रिक्त प्रवेशाच्या जागाही महाविद्यालयांनी दर्शविणे आवश्यक आहे. कोट्यांतर्गत 55 विद्यार्थ्यांचे प्रवेश रद्द करण्यात आलेले आहेत.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.