नवी दिल्ली : प्रत्येक महिन्याच्या सुरुवातीला होणाऱ्या बदलांच्या आपल्या दैनंदिन आयुष्यात देखील परिणाम होत असतो. नोव्हेंबर महिना संपत आला असून 3 दिवसांनी नवा महिना सुरू होणार आहे. 1 डिसेंबरलाही काही नवे नियम लागू होणारा आहे. काय आहेत बदल आणि त्यांचा आपल्या आयुष्यावर काय होणार परिणाम याविषयीची ही सविस्तर माहिती…
प्रत्येक महिन्याच्या पहिल्या तारखेला गॅस सिलेंडरच्या किंमतीचा आढावा घेतला जातो. त्यानंतर त्याचे नवीन दर निश्चित केले जातात. व्यावसायिक आणि घरगुती सिलिंडरचे नवीन दर प्रत्येक महिन्याच्या 1 तारखेला जारी केले जातात. दरम्यान पेट्रोल-डिझेल, सीएनजी पीएनजीचे वाढते दर पाहता गॅस सिलेंडरची किंमतीतही वाढ होण्याची शक्यता आहे.
सणासुदीच्या काळात बहुतांश बँका वेगवेगळ्या होम लोनच्या ऑफर देत असतात. यापैकी अनेकांमध्ये कमी व्याजदर आणि जीरो प्रोसेसिंग फीसचा देखील समावेश असतो. पण, बहुतेक बँकांच्या ऑफर 31 डिसेंबरला संपतात. पण एलआयसी हाऊसिंग फायनान्सची ऑफर 30 नोव्हेंबरला संपते.
तुम्ही SBI क्रेडिट कार्ड वापरत असाल तर 1 डिसेंबरपासून SBI क्रेडिट कार्डने EMI वर शॉपिंग करणे महागणार आहे. सध्या, SBI कार्ड वापरण्यासाठी फक्त व्याज द्यावे लागते, परंतु 1 डिसेंबरपासून प्रोसेसिंग फी देखील आकारले जाईल.
तुम्ही जर नोकरी करत असाल आणि तुमच्याकडे UAN म्हणजेच युनिव्हर्सल अकाउंट नंबर असेल, तर 30 नोव्हेंबरपर्यंत आधारशी लिंक करा. 1 डिसेंबर पासून, कंपन्यांना फक्त UAN आणि आधार लिंक असलेल्या कर्मचाऱ्यांचेच ECR म्हणजे इलेक्ट्रॉनिक चलन कम रिटर्न भरण्यास सांगितले आहे. याचा अर्थ असा की जर एखाद्या कर्मचाऱ्याचा UAN आधार पडताळला नसेल, तर ECR दाखल केला जाणार नाही आणि अशा परिस्थितीत, कर्मचाऱ्याकडून पीएफमध्ये मिळणारे योगदान थांबवले जाऊ शकते.