पुणे – तातडीच्या देखभाल दुरुस्ती कामासाठी गुरूवारी वडगाव व लष्कर जलशुद्धीकरण केंद्राअंतर्गत रामटेकडी टाकी बंद ठेवण्यात येणार आहे. परिणामी, शहराच्या पूर्व तसेच दक्षिण भागातील पाणी पुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. शुक्रवारी उशिरा आणि कमी दाबाने पाणीपुरवठा होईल. त्यानंतर तो सुरळीत होणार आहे.
पाणीपुरवठा बंद असणारा भाग
वडगाव जलकेंद्र परिसर : सिंहगड रोड, हिंगणे, आनंदनगर, वडगाव, धायरी, आंबेगावपठार, दत्तनगर, धनकवडी, कात्रज, भारती विद्यापीठ परिसर, कोंढवा बुद्रुक इत्यादी.
रामटेकडी टाकीवरील परिसर : हडपसर, काळेपडळ, महंमदवाडी, सय्यदनगर, गोंधळेनगर, बी.टी. कवडे रोड, सातववाडी, आकाशवाणी, वैदुवाडी, साडेसतरा नळी इत्यादी.