मुंबई – देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आज 19 जानेवारीला मुंबई दौऱ्यावर येणार आहे. राज्यातील सत्ता संघर्षानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान मुंबईत येत आहे. यावेळी नरेंद्र मोदी मुंबईतील विविध कार्यक्रमांना हजेरी लावणार असून मेट्रो 2 A आणि मेट्रो 7 चे लोकार्पण करणार आहेत. गुरुवारी सायंकाळी 6:30 वाजता मेट्रो 2 A आणि मेट्रो 7 च्या विस्तारित मार्गिकांचे लोकार्पण होणार आहे.
राज्यातील सत्ता संघर्षानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबई दौऱ्यावर येणार आहेत. मोदींच्या स्वागतासाठी मुंबई आणि प्रदेश भाजपने जोरदार तयारी केली आहे. यावेळी मोदी काय बोलतात याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलेलं आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मुंबई दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर मुंबईत काही वाहतूक बदलही करण्यात आले आहेत.
आज दुपारी 12 ते रात्री 9 वाजेपर्यंत पश्चिम उपनगरातील पश्चिम द्रुतगती महामार्ग आणि सर्व रस्त्यांवरील अवजड वाहनांना प्रवेश बंदी करण्यात आली आहे. यातून रुग्णवाहिका, शाळेच्या बस आणि इतर बस वगळण्यात आल्या आहेत. तसेच, दुपारी 4.30 ते सायंकाळी 6.30 वाजेपर्यंत बीकेसी रोडवरील एमएमआरडीए जंक्शन ते एमटीएमएल जंक्शनपर्यंतची वाहतूक नियमन आणि नियंत्रण करण्यात येणार आहे.