मुंबई : एमपीएससीची पूर्वपरीक्षा देणाऱ्या परीक्षार्थींकरिता महत्वाची बातमी आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने राज्यसेवा पूर्वपरीक्षेच्या अर्जासाठी आता 24 जूनपर्यंत मुदतवाढ दिली आहे. नुकतीच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून कमाल संधीची अट रद्द करण्यात आली आहे. त्यामुळे हा निर्णय घेतल्याचे एमपीएससी कडून ट्विट करीत सांगण्यात आले आहे.
जाहिरात क्रमांक 45/2022 राज्यसेवा पूर्व परीक्षा 2022 करीता अर्ज सादर करण्यास दिनांक 24 जून 2022 पर्यंत मुदतवाढ देण्यात आहे. यासंदर्भातील शुद्धिपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे. pic.twitter.com/J4N1hZq9RY
— Maharashtra Public Service Commission (@mpsc_office) June 17, 2022
एमपीएससी कडून पूर्वपरीक्षा 2022 करिता आता 24 जून पर्यंत मुदत वाढवण्यात आली आहे. कमल संधीच्या संदर्भांतील तरतुदीमुळे अनेकांना या परीक्षेसाठी अर्ज करता आले नव्हते मात्र कमाल संधीची अटच रद्द करण्यात आल्यामुळे 24 जून पर्यंत अर्ज करण्यासाठी मुदतवाढ देण्यात अली आहे. परिक्षेसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटी तारीख 24 जून 2022 रात्री 12 वाजे पर्यंत आहे. जाहिरातीतील इतर अटी व शर्ती मध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही.
एमपीएससी कडून खास ऍप
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे अधिकृत मोबाईल ऍप तयार करण्यात आले आहे. हे ऍप गुगल प्ले स्टोअर वर उपलब्ध आहे. शिवाय हे ऍप एमपीएससी ने दिलेल्या स्कॅन कोड द्वारे देखील डाउनलोड करता येणार आहे. हे ऍप निशुल्क उपलब्ध आहे.