नवी दिल्ली, वृत्तसंस्था
अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांच्या अध्यक्षतेखाली चंदिगढ येथे जीएसटी काऊंसिलची मिटिंग सुरु झाली आहे. येत्या 1 जुलै रोजी जीएसटी लागू करण्यास पाच वर्षे पूर्ण होतायत या पार्श्वभूमीवर दोन दिवस आगोदर जीएसटी परिषदेची बैठक होत आहे. या बैठकीत कोणकोणते महत्वाचे निर्णय होऊ शकतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
बैठकीत हे मुद्दे चर्चिले जाण्याची शक्यता
–ऑनलाईन गेमिंग, कॅसिनो आणि रेस कोर्स वर 28 टक्के जीएसटी लागू करण्याचा विचार या बैठकीत होण्याची दाट शक्यता आहे.
–क्रिप्टोकरन्सीवर ही जीएसटी वाढवण्याचा निर्णय होऊ शकतो. सध्या 18 टक्के जीएसटी द्यावा लागतो तो 28 टक्के होण्याची शक्यता.
— वॉटर हिटर, चमचा आणि चाकू यांच्यावरील कर वाढवण्याचा विचार सरकार करत आहे. त्यामुळे त्यांच्याही किंमती वाढण्याची शक्यता.
— प्रिंटरमधील शाई आणि मेडिकल उपकरणांवरील करात सवलत मिळण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे ?
— जीएसटी स्लॅब रेटवर चर्चा होण्याची शक्यता आहे.
–इलेक्ट्रिक वाहनांवरील जीएसटी कमी करण्याची मागणी या बैठकीत होऊ शकते.