क्रिकेट व्यवस्थापन समितीची आज महत्त्वपूर्ण बैठक

मुंबई – भारतीय क्रिकेट नियामक मंडळास राष्ट्रीय उत्तेजक प्रतिबंधक समितीच्या (नाडा) कक्षेत आल्यानंतर त्याबाबत पुढील काय प्रक्रिया करायची हा महत्त्वाचा मुद्दा आज येथे होणाऱ्या मंडळाच्या क्रिकेट व्यवस्थापन समितीच्या (सीओए) बैठकीत घेतला जाणार आहे. त्याचप्रमाणे मंड्‌ळाच्या आगामी निवडणुकांबाबतही चर्चा होण्याची शक्‍यता आहे.

विनोद राय यांच्या अध्यक्षेखाली असलेल्या या समितीत भारतीय महिला संघाच्या माजी कर्णधार डायना एडलजी व लेफ्टनंट जनरल (निवृत्त) रवी थोडगे यांचा समावेश आहे. क्रिकेटमध्ये उत्तेजकास कोणताही थारा द्यायचा नाही व हा खेळ उत्तेजकमुक्त कसा राहील यादृष्टीने योग्य ती पावले कोणती घ्यायची, नाडा संस्थेच्या नियमावलींचे काटेकोरपणे कसे पालन केले जाईल यासंबंधी आजच्या बैठकीत निर्णय घेतला जाणार आहे.

मंडळाच्या निवडणुका 22 ऑक्‍टोबर रोजी घेतल्या जाणार आहेत. त्याचप्रमाणे विविध राज्य संघटनांच्या निवडणुकाबाबतही सविस्तर चर्चा अपेक्षित आहे. भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदासाठी 16 ऑगस्ट रोजी मुलाखती घेतल्या जाण्याची शक्‍यता आहे. त्याकरिता आलेल्या अर्जांची छाननी हादेखील या समितीसमोर विषय आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)