लंडन – ब्रिटनमधील सार्वजनिक आरोग्य आकडेवारीच्या विश्लेषणातून महत्त्वाची माहिती समोर आली आहे. करोनाच्या विषाणूने लहान मुले आणि किशोरवयीन मुलांमध्ये गंभीर आजारी होण्याचा आणि मृत्यू होण्याचा धोका कमी असल्याचे त्यात नमूद करण्यात आले आहे.
हा अभ्यास युनिर्व्हसिटी कॉलेज लंडन, युनिर्व्हसिटी ऑफ ब्रिस्टल, युनिर्व्हसिटी ऑफ यॉर्क आणि युनिर्व्हसिटी ऑफ लिव्हरपूलच्या संशोधकांनी केला आहे. वर्षाखालील कमी वयाच्या मुलांसाठी लसीकरण मोहिमेबाबतही संशोधकांनी सुचना केली आहे. तीन अभ्यास-संशोधनाचे संशोधकांनी विश्लेषण केले आहे.
करोनाची लागण होण्या अगोदर एखाद्या आजाराने ग्रस्त असलेल्या युवकांना, बालकांना झाल्यास मात्र ते गंभीर आजारी होण्याचा धोका असल्याचे संशोधकांनी सांगितले.