भोसरीतील दोन वर्षांपूर्वीची घटना : डॉक्टरासह दोघांवर गुन्हा
पिंपरी – राजीनामा दिल्यानंतर रुग्णालयात पुन्हा येऊन महत्त्वाची कागदपत्रे फाडली आणि बाहेर नेल्याप्रकरणी एका डॉक्टरसह दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भोसरी-एमआयडीसी येथील संत ज्ञानेश्वर रुग्णालयात दोन वर्षापूर्वी घडलेल्या प्रकाराची तक्रार देण्यात आली आहे.
याप्रकरणी, विद्याधर प्रभाकर सरफरे यांनी भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली ओ. त्यावरुन डॉ. जवाहर भलगट आणि संदीप पिसाळ (रा. साईपार्क, सैनिक कॉलनी, दिघी) या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भोसरीतील संत ज्ञानेश्वर रुग्णालयातून पिसाळ यांनी राजीनाम दिला आहे. मात्र, राजीनामा दिल्यानंतरही पिसाळ याने डॉ. भलगट यांच्या सांगण्यावरुन रुग्णालयात येऊन कपाटातील महत्त्वाची कागदपत्रे फाडून टाकली. तसेच, काही कागदपत्रे घेऊन गेला. तेथील कपाटाच्या चाव्या डॉ. भलगट यांच्याकडे दिल्याचे सरफरे यांनी तक्रारीत म्हटले आहे. भोसरी-एमआयडीसी पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक पांचाळ तपास करीत आहेत.