निर्बंधाची अंमलबजावणी…! कुठे ‘हात जोडून’ तर मोकाट फिरणाऱ्यांना काठीचा प्रसाद

पिंपरी-चिंचवड : शहरातील करोनाची संख्या वाढत असल्याने निर्बंध लागू केले आहेत. सायंकाळी 6 नंतर दुकाने बंद करण्यासाठी पोलीस “हात जोडून’ विनंती करत आहेत. तर मोकाट फिरणाऱ्यांना काठीचा प्रसाद देताना दिसून येत आहेत.

दरम्यान, पिंपरी-चिंचवड शहरातील करोनाचे रुग्ण दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात वाढत असून, रोजच धक्कादायक आकडेवारी समोर येत आहे. गेल्या 24 तासांत पुन्हा उच्चांकी 3395 नव्या रुग्णांची भर पडल्याने बाधितांचा आकडा 1 लाख 50 हजार 928 इतका झाला आहे. तर गेल्या 24 तासांत 18 जणांचा मृत्यू झाला आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.