‘एलिफंटा पर्यटनस्थळावर मूलभूत सुविधा निर्माण कार्यावर भर’

मुंबई: एलिफंटा लेणी या जागतिक वारसा स्थळाला रोज भेट देणाऱ्या पर्यटकांची संख्या लक्षात घेता पर्यटकांच्या सोयीसाठी मूलभूत सुविधा निर्माण करण्याबरोबरच या पर्यटनस्थळाचा विकास करण्यासाठी आवश्यक उपाययोजना गतीने कराव्यात, अशा सूचना पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांनी पर्यटन विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या. तसेच एलिफंटासाठी मंजूर झालेल्या रोप वे व इतर विकास कामांबाबत त्यांनी आढावा घेतला. ते काल मंत्रालयात आयोजित एलिफंटा लेणी परिसराच्या विकास आराखडा बैठकीत बोलत होते.

प्राचीन एलिफंटा लेण्यांबाबत माहिती देणारे फलक लावण्यात येणार असून,मिनी ट्रेनचे रूपही आगामी काळात बदलणार आहे. जुन्या ट्रेनची जागा नवी आधुनिक मिनी ट्रेन घेणार आहे. तसेच लेण्यांची माहिती देणारे प्रशिक्षित गाईड तयार करणे, शौचालय बांधकाम, दुकानाचे नूतनीकरण करणे, वृक्ष लागवड करणे, स्वच्छता याबाबत उपाययोजना करणे आदींबाबतच्या कामांना  प्राधान्य देण्याच्या सूचनाही रावल यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.

वर्षाला साधारणतः  15 लाख पर्यटक या पर्यटनस्थळाला भेट देत असतात. त्यादृष्टीने जेटीच्या विस्तारीकरणाबाबत पुरातत्व विभागाकडून आवश्यक त्या परवानग्या घेऊन जेटीचे विस्तारीकरण केले जाईल, असेही रावल यांनी यावेळी सांगितले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.