प्राप्तिकर विभागाची फेसलेस यंत्रणा कार्यान्वित

नवी दिल्ली :- प्रामाणिक करदात्यांना त्रास होऊ नये, कर संकलनात व निवाड्यात पारदर्शकता यावी याकरिता फेसलेस अपील यंत्रणा कार्यान्वित झाली असल्याचे प्राप्तिकर विभागाने म्हटले आहे.

कर विभागाच्या कर मूल्यांकनाला ज्या करदात्यांची हरकत असेल त्यांची शहानिशा फेसलेस पद्धतीने केली जाईल. याला गंभीर गुन्हे, मोठी करचुकवेगिरी, संवेदनशील प्रकरणे, आंतरराष्ट्रीय कर आणि काळा पैसा अपवाद ठरविण्यात आला आहे.

आता संबंधित करदाते आणि कर अधिकारी समोरासमोर येणार नाहीत. त्यामुळे मानवी हस्तक्षेप टळणार आहे. त्यांना या संदर्भात आपल्या घरातून आणि कार्यालयातून पाठपुरावा करता येणार आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.