नगर – शेवगाव तालुक्यातील आव्हाने (खु) येथील गोसावी वस्ती, पवार वस्ती, पठाडे वस्ती, काकडे वस्ती, पानसरे वस्ती येथे सिंगल फेज योजना कार्यान्वित करावी, अशी मागणी जिल्हा परिषद सदस्य हर्षदा काकडे यांनी विद्युत विभागाचे उपकार्यकारी अभियंता यांच्याकडे केली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, आव्हाने खुर्द येथील गोसावी वस्ती, पवार वस्ती, पठारे वस्ती, काकडे वस्ती, पानसरे वस्ती या जवळजवळ रस्त्याच्या दोन्ही बाजूने वसलेल्या वस्त्या आहेत. वस्तीवर वीज नसल्यामुळे नागरिकांना अंधारात राहण्याची वेळ येत आहे.
सध्या परिसरामध्ये वाघोली शिवारात बिबट्याने धुमाकूळ घातलेला आहे. वीजे त्यामुळे नागरिकामध्ये भितीचे वातावरण आहे. तसेच आव्हाणे (बु) ते साकेगाव रस्त्याची दुरावस्था झाली आहे. त्यामुळे या रस्त्याची दुरुस्ती लवकरात लवकर करावी. अशी मागणी बीडीओ यांच्या कडे करण्यात आली.