अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे वक्तव्य
वॉशिंग्टन : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर सुरू असणाऱ्या महाभियोग चौकशी चांगलीच वादात अडकत चालली आहे. राष्ट्राध्यक्ष चौकशीला सहकार्य करत नसल्याचा आरोप करत चौकशी समितीने काही दिवसांपुर्वी व्हाईट हाऊसला नोटीस बजावली होती. तर आता यावर डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्टीकरण दिले आहे. जर नियमाप्रमाणे चौकशी झाली तरच सहकार्य करणार असल्याचे ट्रम्प यांनी म्हटले आहे.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी महाभियोगाच्या चौकशीत आपण सहकार्य करू परंतु त्यांनी निष्पक्ष आणि प्रामाणिक चौकशीची अट चौकशी समिती समोर घातली आहे. संवैधानिक प्रक्रियेतील नियमांप्रमाणे चौकशी होणार असेल तरच डेमोक्रॅट्सच्या नेतृत्वात महाभियोगाची कार्यवाही चालविण्यात ते सहकार्य करण्यास मी समर्थ असेल असे सांगत ट्रम्प यांनी चौकशीवर निष्पक्ष चौकशी होत नसल्याचा ठपका ठेवला आहे. घटनात्मक प्रक्रियेअंतर्गत माझे हक्क मला दिले तर मी तपासात सहकार्य करण्यास तयार आहे. दरम्यान, या अगोदर या प्रकरणात राष्ट्रपती ट्रम्प महाभियोग तपासणीत सहकार्य करत नाहीत असे सांगण्यात येत होते. त्यावरच आता ट्रम्प यांनी स्पष्टीकरण दिले आहे.