नवी दिल्ली: पायाभूत सुविधा आणि स्वस्त घरे वगळता इतर बांधकामावर परिणाम झाला असतानाच करोना व्हायरसच्या उद्रेकामुळे या क्षेत्रावरही परिणाम होणार आहे. त्यामुळेच सिमेंट कंपन्यांच्या उत्पादन क्षमतेवर मोठा परिणाम संभवतो.
गेल्या एक-दोन वर्षांमध्ये सिमेंट कंपन्यांनी आपली उत्पादन क्षमता वाढविली होती. मात्र दरम्यानच्या काळात मंदी निर्माण झाल्यामुळे या क्षमतेचा केवळ 70 टक्के वापर होण्याची शक्यता गेल्या महिन्यात व्यक्त करण्यात आली होती. मात्र दरम्यानच्या काळामध्ये करोना व्हायरसचा उद्रेक झाल्यामुळे आता सिमेंट कंपन्यांची उत्पादन क्षमता त्यापेक्षाही कमी प्रमाणात वापरली जाण्याची शक्यता आहे असे ईक्रा या पत मूल्यांकन संस्थेने म्हटले आहे.
परिस्थिती आणखी नकारात्मक झाल्यामुळे सिमेंटची मागणी केवळ 13 टक्क्यांनी वाढण्याची शक्यता होती. मात्र आता ही मागणी आणखी त्यापेक्षा कमी होण्याची शक्यता असल्याचे या क्षेत्रीाल तज्ञ अनुपम रेड्डी यांनी सांगितले.
त्याचबरोबर या कंपन्यांची उलाढाल कमी होणार असल्यामुळे व उत्पादन क्षमतेचा वापर जास्त होणार नसल्यामुळे या कंपन्यांच्या कर्ज कर्ज परतफेडीवरही परिणमा होणार आहे. या आर्थिक वर्षाच्या पहिल्या नऊ महिन्यांमध्ये सिमेंट कंपन्यांचे उत्पादन केवळ 0.7 टक्क्यांनी वाढून 247 दशलक्ष टन झाले आहे. उत्पादनावर आणखी परिणाम होण्याची शक्यता आहे. कारण सर्वच क्षेत्रातील काम ठप्प झाले असून ते सुरळीत होण्यास मोठा कालावधी लागणार आहे.