कोरोना प्रादुर्भावाचा शिक्षणावर परिणाम – डॉ. स्वाती मुजुमदार

पुणे : कोविड -१९ चा उच्च शिक्षणावर दूरगामी परिणाम होईल. “इंजिनीरिंग व आर्किटेक्चरसाठी प्रवेश परीक्षेस उशीर होईल” असे डॉ. स्वाती मुजुमदार, प्रो-चॅन्सलर- सिंबायोसिस स्किल्स अँड प्रोफेशनल युनिव्हर्सिटी, पुणे म्हणतात.

प्रवेशपरीक्षा न झाल्यास किंवा त्यास विलंब झाल्यास विविध अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता आणि या संदर्भात शासकीय निर्णयांबद्दल विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण होण्याची शक्यता आहे. तसेच नोकरीगमावणे, वेतन कपात, टाळेबंदी, सेक्टर बंद होणे याचा देय क्षमतेवर परिणाम होईल. आर्थिक क्षमता कमीझाल्यामुळे शैक्षणिक कर्ज घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्यावाढू शकते.

विद्यार्थी आणि पालक कमी शुल्क अभ्यासक्रम, अल्प मुदतीचा अभ्यासक्रम आणि ऑनलाईन शिक्षण या कडे गतिमान री-स्किलिंग पर्याय म्हणून अधिक लक्ष देऊ शकतात. शहराबाहेरील विद्यार्थ्यांना असलेल्या कोरोनाच्या धोक्यामुळे आणि न परवडणारे विकल्प असल्याने हॉस्टेलमधील प्रवेश कमी होऊ शकतात कारण पालक त्यांच्या मुलांना घरी राहून स्थानिक पातळीवर शिक्षण देण्यास प्राधान्य देतील. प्लेसमेंटमध्ये मोठी पोकळी जाणवेल परंतु विनामूल्य इंटर्नशिप वाढू शकेल.

सकारात्मक बाजू पाहिल्यास मास्टर्ससाठी परदेशात जाणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या कमी होऊ शकते आणि ते स्थानिक पातळीवर पर्याय पाहू शकतात. ज्येष्ठ विद्यार्थी जे कदाचित नोकरी गमावू शकतात ते शॉर्ट टर्म री-स्किलिंग कोर्सेस शोधू शकतात.

तसेच नवनवीन तंत्रज्ञान उदयास येईल आणि अशा प्रकारे या तंत्रज्ञानामधील अभ्यासक्रमांची मागणी लक्षणीयरित्या वाढू शकेल. हे अभ्यासक्रम आपल्या संस्थेत चालविण्यासाठी आपली संस्था सुसज्ज असणे हि भविष्यातील निकड गरज आहे. अशा कौशल्य-आधारित अभ्यासक्रम चालविणारी संस्था आणि विद्यापीठे जसे की सिम्बायोसिस स्किल्स युनिवर्सिटीस भविष्यातील या बदलास सामोरे जाण्यासाठी तसेच पालक, विद्यार्थी व समाजाची ही मागणी पूर्ण करण्यासाठी मोठ्या प्रमाणात तयारी दर्शवित आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.