imp news । मुख्यमंत्री ठाकरे चिपळूण पूर परिस्थितीची आज करणार पाहणी

सकाळी १० वाजता मुंबईहून हेलिकॉप्टरने चिपळूणसाठी होणार रवाना

मुंबई – कोकणात मुसळधार पावसानं थैमान घातलं आहे. चिपळूण, महाड, खेड तालुक्यात महापूरानं जनजीवन विस्कळीत झालं आहे.

याच परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आज सकाळी १० वाजता मुंबईहून हेलिकॉप्टरने चिपळूणसाठी रवाना होणार आहेत.

गुहागर तालुक्यातील अंजनवेल येथे आरजीपीपीएलच्या एमआयडीसी हेलिपॅड येथे ११ वाजता पोहोचून ते वाहनाने चिपळूणकडे रवाना होतील.

दुपारी १२.२० वाजता चिपळूण येथे आगमन होऊन नंतर ते मदत व बचाव कार्याची पाहणी करतील. त्यानंतर ते दुपारी २.४० वाजता अंजनवेलहून हेलिकॉपटरने मुंबईकडे रवाना होतील.

तर दुसरीकडे केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचाही आज कोकण दौरा असणार आहेत. त्यामुळे उद्धव ठाकरे, नारायण राणे आणि देवेंद्र फडणवीस एकाच दिवशी चिपळूणची पाहणी करणार आहेत.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.