imp news । पुणे-बंगळुरु महामार्ग अजूनही बंद; राज्यात पावसामुळे भीषण परिस्थिती

मुंबई – महाराष्ट्राच्या अनेक भागांत अक्षरशः ढगफुटी झाली आहे. रायगड, रत्नागिरीत पाण्याने धोक्याची पातळी ओलांडून सारा भाग पाण्याखाली गेला आहे. एकंदरीत महाराष्ट्रातील अनेक भागांत पावसामुळे भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे.

राज्यातील अनेक महत्वाचे महामार्ग देखील वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहेत.  पुणे-बंगळुरु महामार्ग अजूनही बंद आहे. काल संध्याकाळपासून किनी टोलनाक्यापासून वाहतूक  बंद करण्यात आली असून,

यामध्ये दुधाचे टँकर, धान्याचे ट्रक असे अनेक वाहने अडकून पडले आहेत. सध्या पुणे- बंगळुरु महामार्गावर जवळपास 20 किमी वाहनाच्या रांगा लागल्या आहेत.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.