IMP NEWS : करोनाबाबत केंद्राच्या नव्या गाईडलाइन्स जारी; जाणून घ्या काय आहेत नवीन नियम

नवी दिल्ली – करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र सरकारने गुरुवारी नवीन मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. काही जुने नियम कायम ठेवत या नव्या गाईडलाइन्स लागू केल्या आहेत. यात केंद्र सरकारने मॉल्स, धार्मिक स्थळे आणि हॉटेल्ससाठी नव्या दिशानिर्देशांची घोषणा केली.

महाराष्ट्र, केरळ, पंजाब, तमिळनाडू, गुजरात, कर्नाटक या सहा राज्यांमध्ये करोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढली आहे. या सहा राज्यांमध्ये एकूण 85 टक्के रुग्ण संख्या आहेत. त्यामुळे या राज्यांनी विशेष काळजी घेणे आवश्‍यक आहे असेही आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे.

धार्मिक स्थळांसाठी मार्गदर्शक सूचना
– धार्मिक स्थळात प्रवेश करताना थर्मल स्क्रिनिंग अत्यावश्‍यक
– करोनासदृश्‍य लक्षणे नसलेल्या भाविकांनाच मंदिरात प्रवेश देण्यात येईल
– मास्क नसलेल्या भाविकांना प्रवेश नाही

मॉलसाठी मार्गदर्शक सूचना
– करोना नियमांचे पालन व्हावे यासाठी पुरेसे मनुष्यबळ असावे
– करोनाचा धोका जास्त असणाऱ्या कर्मचाऱ्यांनी विशेष काळजी घ्यावी
– अशा कर्मचाऱ्यांनी थेट लोकांच्या संपर्कात येऊ नका
– कर्मचारी आणि ग्राहकांसाठी वेगवेगळी एंट्री आणि एक्‍झीट असावी

हॉटेल्ससाठी मार्गदर्शक सूचना
– शक्‍यतो पार्सल घेऊन जाण्यासाठी सांगावे
– होम डिलिव्हरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे थर्मल स्क्रिनिंग अनिवार्य
-.पार्किंग किंवा अन्य ठिकाणी गर्दी होऊ नये यासाठी खबरदार घ्यावी.
– रेस्तरॉंमध्ये प्रवेश करताना असलेल्या रांगेसाठी 6 फूट अंतराचे पालन करणे आवश्‍यक

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.