नवी दिल्ली – जम्मू -काश्मीरच्या कठुआ येथील रणजीत सागर धरणाजवळ २५४ आर्मी एव्हिएशन स्क्वाड्रनचे हेलिकॉप्टर कोसळून भीषण अपघात झाला आहे. हे हेलिकॉप्टर सकाळी १० वाजून २० मिनीटांनी मामून कॅंटमधून उडाले होते. मात्र, रणजीत सागर धरणाजवळ पोहचताच या हेलिकॉप्टरचा अपघात झाला.
Kathua, J&K: An Indian Army helicopter crashes near Ranjit Sagar Dam. Details awaited. pic.twitter.com/ULx3NTeIhD
— ANI (@ANI) August 3, 2021
दरम्यान, घडनास्थळी बचाव पथक दाखल झाले असून बचाव कार्य सुरू आहे. कठुआ जिल्ह्याचे एसएसपी आर सी कोतवाल म्हणाले कि, “रणजीत सागर धरण परिसरात हेलिकॉप्टर कमी उड्डाण करत असताना कोसळले, या हेलिकॉप्टरमध्ये किती लोक बसले याची माहिती मिळाली नाही.