वाघोली – वाघोली तालुका हवेली येथील गावची लोकसंख्या जवळपास दोन लाखाच्या आसपास पोहोचली असून गणेश विसर्जनासाठी पुणे महानगरपालिकेच्या व शिरूर-हवेलीचे आमदार अशोक पवार यांच्या मार्गदर्शनाखाली covid-19 बाबत योग्य त्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करून वाघोली आणि परिसरात गणेश विसर्जनाची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती सामाजिक कार्यकर्ते सुनील जाधवराव यांनी दिली आहे.
शिरूर-हवेलीचे आमदार अशोक पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे महानगरपालिकेच्या वतीने जास्तीत जास्त विसर्जन हौद वाहन उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यासाठी पुणे महानगरपालिकेचे प्रशासकीय अधिकारी व स्थानिक लोणीकंद पोलीस ठाण्याचे कर्मचारी यांच्याशी समन्वय साधून नियोजन करून ही सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे असे सामाजिक कार्यकर्ते सुनील जाधव राव यांनी सांगितले.