वाघोली – केसनंद गावातील घरगुती गणेश विसर्जन तसेच सार्वजनिक गणेश विसर्जनासाठी विसर्जन हौद वाहन स्वखर्चाने उपलब्ध देण्यात येणार असल्याचे पुणे जिल्हा नियोजन समिती सदस्य रामकृष्ण सातव पाटील यांनी सांगितले.
केसनंद ग्रामपंचायतीचे माजी सरपंच मिलिंद हरगुडे, माजी उपसरपंच सचिन जाधव, ग्रामपंचायतीच्या आजी-माजी पदाधिकारी व ग्रामस्थ यांच्या सहकार्यातून या सुविधेचा लाभ सर्व सोसायट्या सर्व वाड्या-वस्त्या मधील गणेशोत्सवासाठी उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे सातव पाटील यांनी सांगितले.
जिल्हा नियोजन समिती मार्फत येथील अनेक गावांसाठी जास्तीत जास्त निधी उपलब्ध करून त्या समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे रामकृष्ण सातव पाटील यांनी सांगितले.