Pune Ganesh Visarjan 2024 | अनंत चतुर्थीच्या मुहूर्तावर लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी पुणेकरांनी जोरदार तयारी केली आहे. आज सकाळी गणपती विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली. पुण्यातील मानाच्या पहिल्या आणि दुसऱ्या गणपती बाप्पाचे विसर्जन झाले आहे. तर मानाचा तिसरा गुरुजी तालीम गणपती अलका चौकात दाखल झाला आहे.
दरवर्षीप्रमाणे गुलालाची उधळण, गुलाबी झालेले सगळे कार्यकर्ते, ढोल ताशांचा जोरदार गजर अशा उत्साहपूर्ण वातावरणात पुण्याचा राजा मानाचा तिसरा गुरुजी तालीम मंडळाच्या मिरवणुकीला जल्लोषात सुरुवात झाली. नादब्रह्म ढोल ताशा पथकाने आकर्षक वादन करत भाविकांचे लक्ष वेधून घेतले.
दरम्यान, पहिल्या श्री कसाब गणपतीचे विसर्जन झाल्यानंतर दुसऱ्या श्री तांबडी जोगेश्वरी गणपतीचे थाटात विसर्जन करण्यात आले. तांबडी जोगेश्वरी गणपतीचे विसर्जन 5 वाजून 12 मिनिटांनी करण्यात आले. तर पुण्याच्या पतंगा घाटावर आरती करून कसबा गणपतीचे विसर्जन करण्यात आले. पहिल्या मानाच्या गणपतीचे विसर्जन 4.35 मिनिटांनी झाले.