सातारा शहरातील विसर्जन मिरवणुकीला प्रारंभ

सातारा – पूरग्रस्तांच्या मदतीची सामाजिक बांधिलकी राखत सातारा शहरातील श्री च्या मांगल्य सोहळ्याचा समारोप अनंत चर्तुदशीच्या दिवशी जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांच्या हस्ते झाला. रिमझिम त्या पावसाला साक्षी ठेवत सातारा शहरातील 84 सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे प्रताप सिंह शेती उद्या नातील विसर्जन तळ्याकडे मार्गक्रमण सुरू झाले .

नगराध्यक्ष माधवी कदम, पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, या मान्यवरांच्या हस्ते श्री आरतीनंतर श्रीफळ वाहून विसर्जन मिरवणुकीला सुरवात झाली. तत्पूर्वी तांदूळ आळी मोती चौक ते राधिका चौक हा विसर्जन मिरवणूक मार्गावर बॅरिकेटिंग करण्यात आल्याने अत्यंत तुरळक गर्दी होती.

खण आळी येथील सम्राट गणपती पावणेपाच वाजताच विसर्जन तळ्याकडे बाबर कॉलनीतून मार्गस्थ झाला. विसर्जन मिरवणुकीच्या सोहळ्यात पहिला सातारा नगरपालिकेचा गणपती, नंतर शिवाजी उदय मंडळ त्यानंतर बऱ्याच अंतराने शनिवार पेठेतील शंकर पार्वती गणपती आणि सोमवार पेठेतील आझाद हिंद गणेश मंडळाचा गणपती रात्री दहा वाजता मोती चौकातून मार्गस्थ झाला.

रात्री उशिरापर्यंत केवळ बावीस मंडळाचे श्री विसर्जन हायड्रॉलिक क्रेनच्या सहाय्याने करण्यात आले होते. श्री मूर्तीचा लोखंडी पाट वेल्डिंग करण्यात आल्याने ते तोडून मूर्ती तराफ्यावर चढवण्यात दीड तासाचा वेळ जात होता. पश्चिम महाराष्ट्रातील पूरस्थितीमुळे साताऱ्यातील कोणत्याच मंडळाने मोठी विसर्जन मिरवणूक काढली नव्हती.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)