डीपी रोड माळवाडी याठिकाणी त्वरित लसीकरण केंद्र सुरू करावे – विराज तुपे

हडपसर – परिसरातील नागरिकांसाठी डीपी रोड, माळवाडी येथे स्वमालकीच्या अथवा पुणे महानगरपालिका हॅन्ड बॉलच्या जागेत “लसीकरण केंद्र” सुरू करावे यासाठी महापौर मुरलीधर मोहोळ आणि आरोग्य अधिकारी डॉ. आशिष भारती यांना महारुद्र प्रतिष्ठान च्या वतीने अध्यक्ष विराज तुपे यांनी निवेदन दिले आहे.

याविषयी सविस्तर दिलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की, “कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढतच चालेल्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने येत्या 1 मे पासून 18 वर्षावरील सर्व लोकांचे लसीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. यापूर्वी 45 वर्षाच्या पुढील नागरिकांना कोरोनावरील लस दिली जात होती.

देशातील कोरोना रुग्णवाढीचा आकडा 3 लाखाच्या समीप पोहोचला आहे. त्यामुळे सर्व वयोगटातील नागरिकांना लस दिली जावी या विचारातून आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेला निर्णय स्वागतार्ह आणि सर्वसामान्यांच्या हिताचा आहे.

18 वर्षे वयाच्या सर्वांना 1 मे पासून लसीकरणाला परवानगी दिली आहे.कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत तरुण वर्गात सर्वाधिक प्रादुर्भाव दिसून येत आहे. यामुळे तरुण वर्गाला तातडीने लसीकरण करून सुरक्षित करण्यासाठी तातडीची उपाययोजना म्हणून हडपसर परिसरातील डी पी रोड माळवाडी याठिकाणी तात्काळ “लसीकरण केंद्र” चालू करावे.

हे ‘ लसीकरण केंद्र’ सुरू करण्यासाठी विराज तुपे यांनी स्वतःच्या मालकीची 3000 स्क्वेअर फूट पत्र्याचे शेड असणारी जागा तात्पुरत्या स्वरूपात विनामोबदला महानगरपालिका देण्याची तयारी दर्शविली आहे. स्व मालकीच्या जागा घेण्यासाठी महानगरपालिकेला अडचण असेल तर डी पी रोड माळवाडी याठिकाणी हॅन्डबॉल स्टेडियमची हॉल सहित मोकळी जागा उपलब्ध आहे. त्याजागेत “लसीकरण केंद्र’ सुरू तात्काळ सुरू होणे गरजेचे आहे. त्यामुळे कोरोनाचा वाढणारा संसर्ग थोपविण्यास सहकार्य होणार आहे, असे मत महारुद्र प्रतिष्ठान चे अध्यक्ष विराज तुपे यांनी निवेदनात व्यक्त केले आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.