नुकसानग्रस्तांना १० हजारांची तात्काळ मदत – वडेट्टीवार

मुंबई: महाराष्ट्रात मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पूर आला आहे. तर काही ठिकाणी दरडी कोसळण्याच्या घटना घडल्या आहेत. या पार्श्वभूमीवर नुकसानग्रस्तांना १० हजारांची तात्काळ मदत आणि धान्य, उद्यापासून मदतीचं वाटप करणार अ्सल्याची माहिती मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली आहे. 

ते पुढे म्हणाले,’आर्थिक आधार नसलेल्या कुटुंबांची तातडीने चूल पेटावी यासाठी १० किलो तांदूळ, १० किलो गहू , ५ किलो डाळ, ५ लिटर रॉकेल ही मदत सुद्धा देण्यात येत आहे.’

 

ते पुढे म्हणाले,’महाराष्ट्रातील कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात पावसामुळे फार नुकसान झाले आहे. आता पर्यत अतिवृष्टी आणि घडफूटीत  १६९ मृत्यू झाला आहे. तर अनेक जन बेपत्ता आहे.   तर ४ लाख हेक्टर शेतीचं नुकसान आहे. हा आकडा आणखी तीनपट वाढण्याची शक्यता असल्याची भीती वडेट्टीवार यांनी व्यक्त केली.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.