‘हायड्रॉक्‍सीक्‍लोरोक्वीन’वर तत्काळ निर्यातबंदी

पुणे – करोना व्हायरसच्या रुग्णांवर उपचार करणारे वैद्यकीय कर्मचारी व रुग्णांच्या नातेवाईकांवर उपचारासाठी उपयोगी पडणारे औषध हायड्रॉक्‍सीक्‍लोरोक्वीनच्या निर्यातीवर तत्काळ बंदी घालण्यात आली आहे.

करोनावर औषध शोधण्यासाठी जगभरात प्रयोग सुरू आहेत. भारतातही यावर संशोधन सुरू आहेत. यामुळे केंद्र सरकारने पुढाकार घेऊन भारतात तयार होणारे हायड्रॉक्‍सीक्‍लोरोक्वीन औषध आणि औषधांच्या कच्च्या मालाच्या निर्यातीवर तात्काळ बंदी लागू केली आहे. इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (आयसीएमआर )चे महासंचालक बलराम भार्गव यांनी मंगळवारी या औषधाचा उपयोग रुग्णांवर उपचार करणारे कर्मचारी आणि रुग्णाचे नातेवाईक यांच्यासाठी होऊ शकतो होऊ शकतो, असे सांगितले आहे.

जगभरात वाढली मागणी
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी या औषधाचा करोना व्हायरसवरील उपचारासाठी उपयोग होऊ शकतो, असे म्हटल्यानंतर जागतिक पातळीवर या औषधाची मागणी वाढली आहे. फ्रान्समध्येही या औषधाचा उपयोग बऱ्याच प्रमाणात प्रायोगिक पातळीवर केला जात असल्याचे वृत्त आहे. त्यामुळे या औषधाची मागणी वाढू शकते. अमेरिका भारतातून या औषधाच्या आयातीचा प्रयत्न करत आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.