अंदमान-निकोबारमध्ये आज मुसळधार पावसाचा इशारा

नवी दिल्ली – अंदमान-निकोबारवरील बेटांवर आणि उत्तर प्रेदश आणि राजस्थानच्या पूर्वेकडील भागात आज वादळी वाऱ्यांसह मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. भारतीय हवामान खात्याने हा अंदाज वर्तवला आहे.

यासोबतच मध्यप्रदेश, झारखंड, तामिळनाडू, ओडिशा, छत्तीसगढ, बिहार, पश्चिम बंगाल आणि सिक्कीम या राज्यांमध्ये आज दिवसभर जोरदार पावसाची हजेरी राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने दर्शवला आहे.

दरम्यान, गोवा, महाराष्ट्रातील कोकण, मराठवाडा, तेलंगणा, आंध्र प्रदेशचा आणि कर्नाटकचा किनारी भाग, या भागांमध्ये जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)