महायुद्ध स्मारकात शीख पायलटची प्रतिमा

लंडन – इंग्लंडमधील साऊथ हॅम्पटन या बंदर शहरात उभारण्यात येणाऱ्या महायुद्ध स्मारकामध्ये एका शीख पायलटची मूर्ती बसवण्यात येणार आहे. हरदित सिंह मलिक असे शीख पायलंटचे नाव असून २० व्य शतकाच्या प्रारंभी लढाऊ विमांनांमध्ये पायलंटचे महत्वाचे काम त्याने केले आहे.

हरदित सिंह मलिक १९०८ मध्ये सर्वात प्रथम वयाच्या १४ व्य वर्षी ऑक्सफोर्ड विश्वविद्यालयाच्या  बैलिओल कॉलेजमध्ये शिक्षण घेण्यासाठी दाखल झाले होते. पहिल्या महायुद्धाच्या काळात ते रॉयल फ्लायिंग कोर  म्हणजेच ब्रिटिश हवाई दलाचे सदस्य झाले. पायलट म्हणून काम करताना हेल्मेट आणि पगडी घालणारे ते पहिलेच पायलट होते त्या काळात ते फ्लायिंग शीख नावानेही प्रसिद्ध होते.

साऊथ हॅम्पटन या बंदर शहरात अशा प्रकारचे स्मारक उभारले जावे असा विचार गेल्या वर्षी पुढे आला होता साऊथ हॅम्पटन सिटी कौन्सिलने त्याला मंजुरी दिली. तेव्हाच  हरदित सिंह मलिक यांची मुर्ती बसवण्याच्या प्रस्तावही स्वीकारण्यात आला.

पहिल्या आणि दुसऱ्या महायुद्धात ब्रिटनकडून सेवा बजावणाऱ्या सर्व शीख सैनिकांचा सन्मान म्हणून हरदित सिंह मलिक याची प्रतिमा बसवण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. हरदित सिंह मलिक यांनी ससेक्स संघाकडून क्रिकेटही खेळले होते.

फ्रान्समधील भारतीय राजदूत म्हणूनही त्यांनी काम केले होते. साऊथ हॅम्पटन या बंदर शहरात उभारण्यात येणाऱ्या महायुद्ध स्मारकाची जबाबदारी  ब्रिटिश मूर्तिकार ल्यूक पेरी यांच्याकडे देण्यात अली आहे. 

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.