अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
वॉशिंग्टन : फेसबुकवर मीच पहिल्या क्रमांकावर आहे तर पंतप्रधान नरेंद्र मोदी दुसऱ्या क्रमांकावर आहेत असा दावा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या एका ट्विटमधून केला आहे. काही महिन्यांपूर्वी फेसबुकचे सहसंस्थापक मार्क झकरबर्गने मला ही माहिती दिल्याचा दावा ट्रम्प यांनी केला आहे. मी भारत दौऱ्यावर जाणार आहे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटण्यासाठी मी खूपच उत्सुक आहे असेही ट्रम्प म्हणाले.
डोनाल्ड ट्रम्प हे 24 आणि 25 फेब्रुवारीला भारत दौऱ्यावर आहेत. त्यापूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेल्या ट्विटची चर्चा पहायला मिळत आहे. ”मला वाटतं हा मोठा सन्मान आहे नाही का? फेसबुकवर मी नंबर 1 आहे तर भारताचे पंतप्रधान दुसऱ्या क्रमांकावर आहे असे काही दिवसांपूर्वीच मला मार्क झकरबर्ग याने सांगितले. मी दोन आठवड्यात भारतात जाणार आहे यासाठी मी खूपच उत्सुक आहे” असे ट्रम्प म्हणाले.
काही दिवसांपूर्वी आठवड्याअखेरीस मोदींशी फोनवरुन संवाद साधल्याचेही ट्रम्प म्हणाले होते. कोट्यवधी लोक विमानतळापासून ते स्टेडिअमपर्यंत माझ्या स्वागतासाठी येणार आहेत असे मोदींनी मला सांगितले असल्याचे ट्रम्प म्हणाले.