मी निर्दोष! राहुल गांधींचा शिवडी न्यायालयात दावा

मानहानी प्रकरणी जामीन मंजूर

मुंबई – पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्या प्रकरणात राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर केलेल्या आरोपाप्रकरणी मी निर्दोष असून मी माझ्या आरोंपावर ठाम असल्याचे स्पष्टीकरण राहुल गांधी यांनी न्यायालयात दिले आहे. या प्रकरणी मुंबईतल्या माझगावं महानगर दंडाधिकारी यांच्या न्यायालयाने 15 हजारांच्या जातमुचलक्‍यावर राहुल गांधी यांना जामीन मंजूर केला.

कॉंग्रेस नेत्या वर्षा गायकवाड यांनी 15 हजारांचा जामीन भरला. पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येला राष्ट्रीय स्वयंसेवक संघांची विचारसरणी कारणीभूत असल्याचे ट्‌वीट राहुल गांधी यांनी केले होते. याच विरोधात राष्ट्रीय स्वयंसेवक संघांचे कार्यकर्ते आणि वकील दृतीमन जोशी यांनी मानहानीचा दावा दाखल केला होता. याच प्रकरणाची सुनावणी आज शिवडी महानगर दंडाधिकारी न्यायालयात घेण्यात आली.

गौरी लंकेश या उजव्या विचारसरणीच्या कडव्या विरोधक होत्या. गौरी लंकेश यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. या प्रकरणी लंकेश यांच्या हत्येनंतर राहुल गांधींनी संघ आणि भाजपवर निशाणा साधला. भाजपच्या विचारसरणीविरोधात बोलणाऱ्या, संघाची विचारसरणी आवडत नसलेल्या व्यक्तींवर दबाव आणला जातो. अशा व्यक्तींवर हल्ले केले जातात, अशी ट्‌वीट राहुल गांधी यांनी केली होता.

Leave A Reply

Your email address will not be published.