सातारा: आज राज्यात विधासभेसाठी मतदार पार पडले. सोबत सातारा मतदार संघात लोकसभेसाठी सुद्धा आज मतदान झाले. लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीकडून निवडणून आलेले उदयनराजे भोसले भाजपमध्ये गेल्याने ही साताऱ्यात पोटनिवडणूक घेण्यात आली. दरम्यान, उदयनराजे भोसले यांनी आकाश व पृथ्वी यांच्यात जेवढ अंतर आहे. तेवढ्या मताधिक्क्याने मी जिंकून येणार अशी प्रतिक्रिया मतदानानंतर दिली.
उदयनराजे म्हणाले, जितकं अंतर जमीन-आसमानमध्ये आहे, तितक्या मताधिक्याने विजयी होणार. चुका कोणाच्या काय असतील ते सगळ पावसात धुवून गेलं. महायुतीचे सर्व उमेदवार मोठ्या फरकाने विजयी होणार.